प्रेम - वेडा भाग १

  • 12.6k
  • 4.8k

------------- २ मार्च २०१२ ------------अनिरुद्धला फॅमिली फंक्शन्स कधीचं आवडले नाहीत , पण तरी वडिलांच्या निर्णयापुढे त्यांचे काही एक चालले नाही . आणि आज त्याला गुरव परिवारांच्या एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यास भाग पडले होते . सोबत आपल्या वयाचे कोणीच नसल्याने त्याला तो कार्यक्रम कंटाळवाणा वाटू लागला होता , तेवढ्यात त्याची नजर एका लहान मुलीवर पडली ... तिला खेळताना पाहून त्याचा चेहरा खिळला .... वेळ तर तसंही जात नव्हता तर त्या लहान मुलीसोबत खेळावे या विचाराने तो तिच्या दिशेने जाऊ लागला ....पण त्याच वेळी तिथे एक सुंदर मुलगी येवून पोहचली व त्या लहान मुलीसोबत खेळू लागली होती . तिचे गाल ओढू लागली होती