अंतःपुर - 11

(22)
  • 11.6k
  • 5.4k

११. सत्य (दि ट्रुथ फ्रॉम दि ट्रेटर)...उघड्या असलेल्या दरवाजातून शुक्ला आत आला. तसा उघडा दरवाजा ढकलला गेला. दरवाजा मागे शक्ती उभा होता. त्याच्या हातात पंतप्रधानांच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या एका एजंटची 'एफएन हर्स्टल्' होती. शक्तीनेच दार लोटले होते."चुपचाप कुर्सी पर बैठो!" तो मागून ओरडला. शुक्लाने मागे पाहिलं. शक्ती हातात पिस्टल घेऊन उभा दिसला. तो घाबरून खिडकीला अपोजिट उभ्या व त्याच्याकडेच पाहत असलेल्या पीएमकडे वळला. पीएम देखील हतबल होते. असहाय्यता त्याच्या मुखमंडलावर स्पष्ट होती. ते मागे हात बांधून उभे होते. शुक्लाला नजर न देता त्यांनी खाली पाहिलं. याचा अर्थ शुक्ला समजून चुकला. पीएमनी शुक्लाला शक्तीला सोपवलं होतं हे सहज होतं!तो गपचूप काही न बोलता