होय, मीच तो अपराधी - 5

(11)
  • 7.5k
  • 1
  • 3.4k

५) होय, मीच तो अपराधी! पंधरा-वीस मिनिटांनंतर न्यायमूर्ती पुन्हा स्थानापन्न झाले. त्यांनी आधी नरेश आणि नंतर नलिनीकडे रागारागाने बघत विचारले, "व्हाट इज धीस नॉन्सेन्स?""सांगतो. मायलॉर्ड, सारे सांगतो. सर्वप्रथम मी आपली, वकीलसाहेब, पोलीस आणि जनता सर्वांची माफी मागतो. बलात्कार वगैरे झालेला नाही. नलिनी आणि माझे एकमेकांवर खूप प्रेम आहे. नलिनी, एक साधी, सरळ मुलगी आहे. आता दिसते तशी बोल्ड मुळीच नाही.""मला ओळखणारे अनेकजण मला काकुबाई असेच म्हणतात. मी काही रेवपार्टी, डान्सबार, पब अशा ठिकाणी जाणारी मुलगी नाही. माझ्यासारख्या मुलींनाही समाजात नानाप्रकाराने छळ, अपमान सोसावा लागतो. इतर शहरांचे सोडा परंतु आपल्या शहरातही रेवपार्टी, पब, डान्सक्लब