प्रेम म्हणजे प्रेम असत- ४

(17)
  • 19k
  • 1
  • 9.5k

प्रेम म्हणजे प्रेम असत- ४ रितू ला स्वतःवरच हसू येत होते. तिच्या कडे समोरून प्रेम चालत येत होते पण तरी ते ती मान्य करू शकत नव्हती. तिची नकार घंटा चालूच होती. पण तिचे बोलणे ऐकून जय खरच वैतागला होता. आता अजून काय कराव लागेल रितू ला पटवायला ह्याचा त्याला अंदाज येत नव्हता... तो जरा वैतागूनच बोलला, "काय म्हणत होतीस रितू? जरा प्लीज परत सांगतेस का?" "मी काय बोलले ते ऐकल नाहीस का?" "ऐकल ग... पण परत ऐकायचं आहे..सांग सांग!! मग मी बोलेन.. तिखट शब्दात बोलायचं आहे मला.. फार घेतली तुझी मनमानी चालवून.. पण तुल नक्की काय