दोन टोकं. भाग २१

(16)
  • 11.2k
  • 5.8k

भाग २१ हळुच दार उघडलं आणि सायली आत आली. विशाखा झोपली होती. तीने लाईट लावली आणि विशाखाच्या जवळ येऊन बसली. झोपेत ते कापसाचे बोळे तीच्या डोक्याखाली गेले होते. सायली ने हळुच ते उचलुन कच-याच्या डब्यात टाकले. आणि तीच्या डोक्यावरून हात फिरवला. हात लागला तशी विशाखाची झोप चाळवली आणि तीने डोळे उघडुन बघितलं तर समोर सायली. विशाखा जोरात दचकली आणि ओरडली, " आ..... " " ए..... गप ना. ओरडायला काय झालंय. ? " तीच्या तोंडावर हात ठेवत सायली म्हणाली. " तु इथे काय करतीयेस ?? " उठुन बसत तीने विचारलं." मी नेहमीच येते. त्यात नवीन काय ? " " हो पण पहाटेचे चार वाजलेत. कळतंय का ??