परवड भाग १०

  • 8.3k
  • 4.2k

भाग १०अरविंदा रात्री घरी आला आणि दररोजची कामे सुरू केली.काम करता करता त्याला आज चहाला गेल्यानंतर देशमानेने केलेली त्याची मस्करी आठवली....देशमाने अरविंदाला म्हणत होता ....“ एखादी बाईच ठेव ना घरकामाला...!”“ नाहीतर, अरविंदा, तू अजून एक गोष्ट करू शकतोस....दुसर लग्नच करून टाक ना! सगळेच प्रश्न मिटतील तुमचे!” “काय म्हणाला तो?”“दुसर लग्न...?”नकळत देशमानेनी अरविंदाच्या मनात एक वेगळाच विचार पेरला होता! लग्न करायच्या त्या विचाराभोवती त्याचं मन आता नको नको म्हणत असतानासुध्दा पिंगा घालायला लागलं होत. देशमानेनी खरंच एक वेगळा मार्ग अरविंदाला दिला होता... त्याने स्वतःच दुसरं लग्न करायचं! तो आता त्याच विचारांच्या द्वंद्वात फसला होता... त्याचं एक मन म्हणत होते....”खरच काय हरकत आहे?”“लग्न ?” “आता या वयात?” “लोक काय म्हणतील?” “वसंता काय विचार