स्पर्श - भाग 15

(35)
  • 17.4k
  • 11.5k

दुपारची सायंकाळ झाली होती पण राहुलचा फोन काही आला नव्हता ..इकडे माझी बेचैनी अधिकच वाढू लागली होती ...जेवणातसुद्धा मन लागत नव्हत ..जेवण करून सर्व झोपायला गेले आणि मी टेरिसवर मोकळ्या हवेत पोहोचलो ..तितक्यात कुणाचा तरी फोन आला पण तो राहुलचा नव्हता म्हणून मी उचलला नाही ..फोन कट झाला आणि पुन्हा एकदा आला आणि कंटाळून शेवटी उचललाच .." हॅलो ..आपण अभिच आहात ना ? " , ती म्हणाली आणि मी उत्तर देत म्हणालो , " आपण कोण ? " ..ती समोरून हसत म्हणाली .., " वा !! काय लोक आहेत ना काही तासाआधी मला पाहायला आले होते नि एवढ्या लवकर