आजारांचं फॅशन - 22

  • 5.6k
  • 1.9k

डॉक्टर खूप उत्स्फुर्त पणे अनिलला प्रोत्साहन देत होत्या, अनिलला देखील ही एक सोनेरी संधी वाटली, त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा एक वेगळा रंग दिसत होता आणि तोच आनंद आणि रंग घेऊन अनिल क्लीनिक मधून निघाला आणि ह्या वेळेस पहिल्यांदा मेडिकल शॉप मध्ये नाही तर स्टेशनरीच्या दुकानात कलर आणि पेपर घेण्या साठी गेला. अनिल एक वेगळी ऊर्जा आणि स्फूर्ती घेऊन घरी आला, औषधे आणि चित्रकलेचे सामान घरी ठेवले आणि गॅरेज कडे निघाला, त्याला काम, उपचार आणि छंद ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालायची होती आणि प्रत्येक गोष्टीला आवश्यक तो वेळ द्यायचा होता. एक वेळ अशी होती कि अनिलकडे खूप रिकामा वेळ आणि रिकामे विचार