४) होय, मीच तो अपराधी! काही वेळानंतर कामकाजाला सुरुवात झाली. सरकारी वकील म्हणाले, "त..त तू आतापर्यंत अनेकदा स्वतःच्या तोंडाने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.""झाले. एवढेच? मी जर न्यायालयात सांगितले की, आत्तापर्यंत... या क्षणापर्यंत माझ्याकडून जबरदस्तीने गुन्हा कबूल करवून घेतलाय तर...""असे कसे? तू असे करु शकणार नाहीस." सरकारी वकील म्हणाले."का नाही? मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना बचावाची संधी दिली जाते. पोलिसांसमोर दिलेला कबुलीजबाब नंतर न्यायालयात अनेकजण फिरवतात. ते जाऊ देत. समजा मी उद्या अशा एखाद्या व्यक्तिला उभे केले जी व्यक्ती प्रतिष्ठित आहे, सरकारदरबारी वजनदार आहे आणि त्याने असे सांगितले की, गुन्हा घडला त्यादिवशी, गुन्हा घडला त्यावेळी नरेश माझ्यासोबत होता तर...""येस मायलॉर्ड! दॅट्स