नवनाथ महात्म्य भाग १५ सातवा अवतार “रेवणनाथ “ ================ पातला परी अकस्मात । येता झाला बाळ जेय ।। सहज चाली पुढे चालत । बाळ दृष्टी देखिले । रेवणनाथ जन्मकथा ब्रह्मादेवाच्या वीर्यापासून पुर्वी अठ्यांयशीं सहस्त्र ऋषि उत्पन्न झाले. त्याच वेळी जे थोडेसे रेत पृथ्वीवर रेवा नदीच्या तीरी पडले त्यात चमसनारायणाने संचार केला. तेव्हा एक बाळ निर्माण झाले . ते बाळ सुर्यासारखे दैदीप्यमान दिसत होते . जन्म होताच त्याने एकसारखा रडण्याचा सपाटा चालविला. त्याच वेळेस सहन सारुख यानावाचा एक कुणबी पाणी आणावयास नदीवर गेला होता. त्याने ते मुल रेतीत रडत पडलेले पाहीले तेव्हा त्याचे हृदय कळवळले. त्याने त्या मुलास उचलून घेतले