कादंबरी- जिवलगा भाग -३२- वा

(24)
  • 14.8k
  • 1
  • 8.1k

कादंबरी –जिवलग भाग -३२ वा ----------------------------------------------------- हेमू पांडे बाहेर पसेज मध्ये पाहत होता , स्वतःच्या विचारात गुंग असलेली नेहा येतांना पाहून त्याच्या मनात विचार आले.. आपण नेहाबद्दल सतत विचार करीत असतो , पण, तिच्या मनातले काही एक आपल्याला ती कळू देत नाहीये . ज्या अर्थी सोनिया आणि अनिता या दोघींनी अजून काही निगेटिव्ह सांगितलेले नाहीये ..याचा अर्थ ..नेहाच्या मनात आपल्याबद्दल काही नाहीये असे मानले तरी .. आपण आपल्याकडून प्रयत्न चालूच ठेवत राहिलो तर..तिच्या मनात आपल्या विषयी एक छान भावना नक्कीच निर्माण होऊ शकेल. हेमू पांडे स्वतःला धीर देत होता , फ्लोअर –पेसेज मधून येणार्या नेहाकडे तो पहात राहिला ..किती छान