मायाजाल--- ७गणपत भगताला भेटायचं आहे; हे कळल्यावर मुलं थोडी नर्व्हस झाली."अरे इंद्रजीत! हा इथल्या रहिवासी लोकांचा प्रश्न आहे! आपण त्यात कशाला पडायचं?" एक जण म्हणाला. "आपण चार दिवसांचे पाहुणे! आपलं काम करू; आणि निघून जाऊ! उगाच भांडणं कशाला?" दुसरा म्हणाला."जीत! तो खूप भयंकर माणूस आहे! लखू काय म्हणाला ऐकलंस नं? त्याच्या नादाला न लागलेलं बरं! आणि आता तर लखू आपल्याबरोबर