स्पर्श - भाग 14

(21)
  • 17k
  • 1
  • 11.3k

राहुलचा नंबर स्क्रीनवर झळकू लागला आणि माझ्या हृदयाचे ठोके आणखीनच जास्त गतीने वाढू लागले ..कॉल रिसिव्ह करताच राहुल म्हणाला , " सॉरी यार अभि " ..वाटलं पुन्हा एकदा नशिबाने साथ सोडली ..फोन लगेच खाली फेकून द्यावासा वाटत होता पण राहुल आताही कॉलवर होता त्यामुळे मी शांत होऊन त्याच बोलणं ऐकू लागलो ..पुन्हा तो बोलू लागला , " सॉरी यार अभि ..मला वाटत या जन्मात ती तुझीच असेल ..मी म्हटलं घरचे तरी नकार देतील आणि तुझा पत्ता कट होईल पण अस काहीच झालं नाही ..तू कॅनडाला जॉब करतोस , वेल सेटल आहेस , सॅलरी मस्त आहे हे ऐकून त्यांनी