भाग ९ सुटला सुटला म्हणता म्हणता अरविंदाच्या आयुष्यात हा एक नवा गुंता सुरू झाला होता.पुन्हा नवा पेच समोर उभा ठाकला होता.जणू संकटामागून संकटे त्याचा पाठलाग करत होती......तो रात्रंदिवस आपल्या आयुष्याबद्दल विचार करत होता....“या नियतीच्या मनात नक्की काय आहे? मी जीवनात कधी कुणाचे वाईट करणे सोडाच; पण कधी कुणाचे वाईट व्हावे असा विचारही केलेला नाही, असे असताना माझ्याच मागे अशी संकटे का?” आता त्याचे वय पंचावन्नवय वर्षे झाले होते.अगदी मोजकी काही वर्षे सोडली तर कायमच दुर्दैवाचे दशावतार त्याच्या वाट्याला आले होते! मनाची अस्वस्थता त्याला चैन पडू देत नव्हती!ऑफिसातून बाहेर पडल्यावर आज त्याने पांडूरंगाचे मंदिर गाठले.विठ्ठलासमोर साष्टांग नमस्कार घालून त्याने देवाला साकडे घातले.” हे विठ्ठला,या भक्ताची अजून