कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- १७- वा

  • 8.3k
  • 2
  • 2.5k

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग- १७ वा ------------------------------------------------------------------------------------ सकाळ झाल्यापासून अनुशाच्या आजच्या दिवसाची सुरुवात अगदी अधिरतेने झाली होती . टेन्शन नसतांना मनावर एक वेगळेच दडपण आले आहे ज्यात भीती कमी आणि उत्सुकता जास्त आहे असे तिला जाणवत होते . तिने लगेच अभिजीतच्या दीदींला फोन लावला .. दीदींना गुड मोर्निंग करीत ती म्हणाली .. दीदी ..आज अकरा वाजता मी बाबांच्या ..आय मीन ..मिस्टर सागर देशमुख यांच्या ऑफिसमध्ये जाते आहे ,इतके दिवस ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत सगळी तयारी केली आणि नेमक्या आजच्या सकाळ पासून मला एक वेगळेच टेन्शन आले आहे .. काय होईल,कसे होईल ? मला जमेल का ?