“पुरे झाले आता. हे सर्व सहन करण्यापलीकडचे आहे. आपण आपले वेगळे घर घेऊन राहू.” राधिकाने मनोहरपंतांना फर्मान काढले.“काय झाले? आजही परत मानसीशी वादावादी झाली का? काय हे? तुला किती वेळा सांगितले कि ती नवीन आहे आपल्या घरात, थोडे समजून घेत जा ना.” “हो..हो..मीच समजून घेत आले आजवर. आधी सासरच्यांना आणि आता सुनेला! मला मेलीला माझे असे काही आयुष्यच नाही.” राधिकाचा त्रागा चालूच होता.शेवटी मनोहरपंत समजुतीच्या स्वरात म्हणाले,” बरं, आता झोप शांतपणे. आपण उद्या सकाळी जाऊ नवीन घर शोधायला.”“तुमचा उद्या कधी उजाडणार आहे कोण जाणे!!! पण आता मी माघार घेणार नाही.” असे म्हणत राधिका रागारागातच अंथरुणात शिरली.सकाळी मनोहरपंत उठायच्या आधीच राधिका सर्व