अंतःपुर - 9

(20)
  • 14.4k
  • 6.9k

९. नवीन कारस्थान (अ न्यू कॉन्स्पिरसी)...शक्तीची कावासाकी (आता शक्तीचीच) एका पेट्रोल पंपला लागली होती..."साहेब किती?" पेट्रोल भरणाऱ्याने विचारलं."फुल करा!" शक्ती म्हणाला.त्या कर्मचाऱ्याने शक्तीला हवी तेवढी त्याच्या गाडीची टाकी भरली. गाडीत पाच लीटर तेल होते, पण शक्तीला जे काम करावं लागणार होतं, त्यासाठी त्याला किती हिंडावे लागणार हे त्याला देखील माहीत नव्हतं. म्हणून त्याने सतरा लीटरची फ्युल टॅन्क पूर्ण भरण्याचा निर्णय घेतला होता..."अलीकडे पेट्रोल बरंच महागलंय नाही?" फ्युल डिस्पेन्सरच्या डिजिटल डिस्प्लेच्या आकड्यांवर नजर लावलेला शक्ती पाकिटातून नऊशे साठ रुपये काढून देत त्या कर्मचाऱ्याला म्हणाला."होणारच ना साहेब. पेट्रोलच का? सगळंच महागलंय. तिकडं आखाती देशांत युद्धं चालू आहेत, त्याची भरपाई आपण करतोय! या