भाग १९ पंडितने तो मुलगा काय बघतोय हे बघायला आत वाकुन पाहिल तर विशाखा टेबलवर हात ठेवून, त्यावर डोकं ठेवून गाढ साखरझोपेत घोरत होती. तीला तसं बघुन पंडितने तर डोक्यावरचं हात मारून घेतला ?. जवळ जाऊन तीला उठवलं, " मॅम........ मॅम...... " हाक मारली पण विशाखा ढिम्म. पण तो हँडसम मुलगा तीला तसं बघुन हसायला लागला. पंडितने रागाने मागे त्याच्याकडे बघितल तर तो गप्प बसला. पण जसं ह्याने पुढे बघितलं तसं तो परत हसायला लागला. आणि ते पण मोठमोठ्याने हसायला लागला. " ही...... ही.... आत्ताच.... आली....ये .... ना.. तरी.... झो...पलीये.... ?? " हसता हसता त्याने विचारल आणि परत हसायला लागला. इतका हसत होता की