परवड भाग ८.

  • 8.5k
  • 4.6k

भाग ८.रात्रभर अरविंदा जागाच होता.नक्की काय चाललय घरात?सुनबाईला नक्की कसला त्रास आहे?गुणवंताही गप्प गप्प का आहे ?विचार करून करून त्याच्या डोक्याला मुंग्या आल्या.रात्रभर जागरण झाल्यामुळे त्याचं डोकं चांगलंच ठणकायला लागलं होत! “आज या दोघांना सकाळी सकाळीच नक्की काय झालय ते विचारायचं! “अरविंदाने निश्चय केला आणि सकाळी आन्हिके उरकून तो त्या दोघांची वाट पहात बसला.प्रथम सुनबाई आली आणि अरविंदाला चहा दिला. अरविंदाने सुनबाईला हाक मारून समोर बसवलं. गुणवंतालाही बाजूला बसायला सांगितले.दोघेही मान खाली घालून त्याच्या समोर बसले.अत्यंत हळू शांत आवाजात तो बोलायला लागला.....“गुणवंता व सुनबाई मी दोन तीन दिवस बघतोय की तुमच्या दोघांच काहीतरी बिनसलंय.सुनबाईला बर नाही का? काही त्रास आहे का?”त्याने सुनबाईकडे उत्तराच्या अपेक्षेने