नवनाथ महात्म्य भाग १२ सहावा अवतार भर्तृहरिनाथ ================ भर्तरी भंगताचि बाळ त्यांत । तेजस्वी मिरविले शकलांत ।। क्षिकेचे मोहळ व्यक्त । तेही एकांग जाहले भर्तृहरिच्या जन्माचे गुढ उकलले नाही. मात्र ग्रंथात उल्लेखील्याप्रमाणे एकदा उर्वशीचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याचा वीर्यपात झाला. त्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषीच्या भिक्षापात्रात पडला. त्यातून 3103 वर्षांनी भगवान अवतार घेतील, हे ऋषींनी ओळखले. त्यांनी हे पात्र जपून ठेवले. ठरल्या वेळी द्रमीलनारायण त्यात प्रवेश करून प्रकट झाले. बालकाचा जन्म झाला. ते बालक म्हणजे भर्तृहरि नाथ. त्याला एका हरिणीने आपल्या पिलांसोबत मोठे केले. हरणांच्या संगतीत झाडांचा पाला खाऊन तो मोठा झाला. एकदा जंगलातून जयसिंग व रेणुका हे