मिरगाचा पाऊस

  • 10.4k
  • 2.4k

"निमा! तांदळाची भाकर करते ना ग? आणि हो... थोडं सुक्या करदीच कालवण, त्याबरोबर खाऱ्या बांगड्याच तोंडीलावणं पाहिजेच. नाहीतर जेवायची नाही हो ती." आप्पांनी हसत-हसत फर्मान सोडला होता. "होय. आप्पा सगळं करते." निमाही रोजच्याच सवयीप्रमाणे बोलून गेली. "आणि ते ..." "हो. हो... समजलं आप्पा. करदीच्या कालवणात कच्या कैरीच्या चार फोडी टाकायच्या, कोकम नाही. त्याने चव बिघडते. बरोबर ना?"तिच्या या वाक्यावर दोघेही मनसोक्त हसले. "कैरी नसेल तर आंब्याची वाळलेली दोन आमसूल टाकायची. झकास बेत होईल." म्हणत आप्पा उठून पडवीत आले. अंगणातून समोरच्या बेड्याची टेहळणी करत त्यांनी नकारार्थी मान डोलावली. जेमतेम अर्धी घटिका सरते न सरते तोच त्यांनी पुन्हा थरथरत्या पावलांनी स्वयंपाक घरात