नवनाथ महात्म्य भाग ११ पाचवा अवतार ” कानिफनाथ “ =================== श्री नऊनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रुपाने अवतार घेतले. त्याचप्रमाणे श्री प्रबुध्द नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले. गर्भगिरी डोंगरावरून वाहणाऱ्या पुनागिरी नदीकाठी उंच किल्ल्यावर माधी नावाचे गाव आहे. आणि इथे या महान संताची समाधी आहे. या किल्ल्यावर श्री कानिफ नाथ महाराजांनी १७१० मध्ये फाल्गुन महिन्याच्या वैद्य पंचमीला समाधी घेतली. ईथे लाखो भाविकांची श्रद्धा आहे. असे मानले जाते की ब्रह्मदेव एके दिवशी सरस्वतीकडे आकर्षित झाले जेव्हा त्यांचे वीर्य खाली पडले, ते हवेत उडून हिमाचल प्रदेशात भटकत असलेल्या हत्तीच्या कानात गेले . काही