भुताचं लगीन (भाग १)

(14)
  • 13.8k
  • 5.1k

आईऽ..ऐ...आईऽ कुठेस गं ? हे बघं मी आलोय कामावरून, लवकर बाहेर ये! पार्कींग मध्ये गाडी लावता लावता दिगंबर आईला हाक मारू लागला. त्याचा आवाज ऐकून त्याची आई बाहेर आली. "हा ! आलास तू ऐवढी आरडाओरडा कशाला करतोय, नक्कीच चहा हवा असणारं म्हणूनच ना? तू आधी हातपाय स्वच्छ धुऊन घे मग ये चहा प्यायला." "अगं.. तुझ्या चहाला मार गोळी, एक गुड न्यूज आहे, ती तर ऐकून घे!" "अरे व्वा.. गुड न्यूज, खरंच?" भुवया उंचावून आई म्हणाली. "हो..! माझ्या ६ महिन्यांच्या कामावर खूश होऊन, बाॅस ने मला प्रमोशन दिलंय आणि त्याबरोबर एक नवीन प्रोजेक्ट सुध्दा दिलाय. "अरे व्वा..देवच पावला म्हणायचा,थांब आधी देवापुढे