कोणी बोलावले त्याला? (अंतिम भाग )

(51)
  • 15.2k
  • 3
  • 6.2k

मागील भागावरून पुढे...... दुसऱ्या दिवशी मंदाकिनी सकाळी लवकर उठली.आपले स्नान , जेवण वैगरे आटपून ती आजी कडे गेली... " आजी ! मी आलेय. "" ह्म्म्म.... मंदाकिनी , आता मी काय बोलतेय ते नीट लक्षात घे... मी तुला काही मंत्र शिकवणार आहे. ते तू चांगल्या प्रकारे पाठांतर करून घे.... "" पण आजी मला ते मंत्र कशाला पाठ करायचे आहेत? "" वेळ आली की मी सांगीन.... सध्या मी जसे म्हणतेय तसें ते मंत्र माझ्या मागून म्हणत जा..."असे म्हणून आजीने मंत्र म्हणायला सुरवात केली. दुपारी दोघी जेवायला थांबल्या. आणी पुन्हा संध्याकाळी परत मंत्र पठण चालू केले. सलग दोन दिवस असे करून आजीने तिच्या कडून ते