गुरुपौर्णिमा! मानवी कल्याण हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून ज्यांनी अठरा पुरणांचे ज्ञानदान अखिल विश्वाला दिले त्या तेजस्वी ज्ञानी वेदव्यास मुनींची जयंती. धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्राची सांगड घालून 'महाभारत:' हे संस्कृत महाकाव्य रचणारे कविराज! मानवी जीवनात उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रश्नांचा विचार करून मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे महाभारत! महाभारतात जे असेल ते अन्य ग्रंथात असू शकेल पण जे महाभारतात नाही ते-'न तत्र अन्यत्र!' ते कुठेहि असणार नाही, अशी व्यासांच्या या महाकाव्याची ख्याती आहे. महर्षी व्यासांनी एवढे काम करून ठेवले आहे की त्यानंतर वेगळे काहीच उरले नाही, हे सांगणारी 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्' ही उक्ती प्रसिद्ध आहे. ज्ञानमय ज्योत मानव कल्याणासाठी प्रज्वलित करणाऱ्या या गुरूंची