परवड भाग ७.

  • 9.5k
  • 4.8k

भाग ७. गुणवंता आणि शालूची जोडी छानच दिसत होती.अगदी एकमेकांसाठीच ते दोघे बनले आहेत असचं सगळेजण बोलायचे.या दोघांचा नवा संसार आता सुरू झाला होता. आपल्या बायकोसाठी काय करू आणि काय नको असं गुणवंताला झालं होत.त्यांनी एकमेकांशी छान जुळवून घेतल्याचं बघून अरविंदालाही खूप समाधान वाटत होत.सीतेच्या जाण्यानंतर या घरात कोणा बाईमाणसाचा वावर नव्हता.शालूच्या रूपाने या घराला खूप दिवसांनी हक्काची गृहिणी लाभली होती. लग्न पार पडल्यानंतर गुणवंताच्या शेठने या दोघांच्या हातावर महाबळेश्वरची तिकिटे ठेवली आणि शालू आणि गुणवंता महाबळेश्वरला हनिमूनला गेले.चांगले चार दिवस गुणवंता शालूला घेवून महाबळेश्वरात उत्तम हॉटेलात राहिला. दोघांनी मस्त एन्जॉय केलं..... ते आता परत घरी आले