दोन टोकं. भाग १८

(19)
  • 11.9k
  • 1
  • 6k

भाग १८ सायली सकाळी सकाळी घरी आली. " विशाखा..... विशाखा...... विशाखा..... " आत येतानाच ती ओरडत ओरडत आली, तीच्या आवाजाने काका बाहेर आला. " काय गं ?? एवढ्या लवकर कसं काय ?? " " विशाखा कुठे आहे ? " " कुंभकर्ण अजुन झोपलाय. इतक्या लवकर उठते का ती ?? " " अजुन झोपलीये ? ?? काय पोरगी आहे ही ??"" का गं ?? काय झालं ?? " " अरे मी काल कॉल केला तेव्हा निघाली हॉस्पिटलमधून. मला म्हणाली घरी गेल्यावर करते आणि केलाच नाही. मी वाट बघत बसले होते की ती कॉल करेल म्हणून ? " " अच्छा. तरी रात्री जरा उशीरच झाला तीला यायला. साडे अकराच्या दरम्यान