परवड भाग ६.

  • 9.5k
  • 4.8k

भाग ६. वधूवर मंडळाकडून गुणवंताची माहिती व फोटो मिळाल्यावर शालूचे बाबा-संपतराव चांगलेच खूश झाले होते.अगदी त्यांच्या मनासारख हे स्थळ चालून आलं होत. महत्वाचं म्हणजे हे स्थळ बऱ्यापैकी लांब गावातलं होत, त्यामुळे शालूच्या पूर्वायुष्याबद्दल तिकड कुणाला काही माहिती असायची मुळीच शक्यता नव्हती. आधी तमासगीर असलेल्या आईचा चवचालपणा हिच्यात पुरेपूर उतरला होता.आपल्या पदरात ही सहा वर्षाची पोरगी टाकून तिने हे जग सोडले आणि हा फास कायमचा आपल्या गळ्यात अडकला होता.ही कारटी वयात आली आणि आपल्या बापाला लक्ष द्यायला वेळ नाही याचा तिने चांगलाच फायदा घेतला.तारुण्याचा कैफात तिने काय काय उद्योग केले ते समजले की याचा तिळपापड व्हायचा पण काय करणार? “ गरीबाला का कुठे