आजारांचं फॅशन - 16

  • 5.9k
  • 1.9k

“तुम्हाला असं का वाटतं मनोचिकित्सक डॉक्टर हे वेड्यांचे डॉक्टर असतात, आपण ज्या जगात जगतो आणि आपली सध्याची जी जीवन शैली आहे त्या मुळे स्ट्रेस, डिप्रेशन, निद्रानाश, वैगेरे, वैगेरे असे खूप मानसिक आजार होणे स्वाभाविकच आहे, म्हणून आपण वेडे झालो असा समजच मुळात चुकीचा आहे, माझे ऐक मी तुला एक चांगल्या डॉक्टरांची चिट्ठी देतो त्यांना जाऊन भेट, डॉक्टर खूप चांगल्या आहेत, तुझा त्रास पूर्णपणे ठीक करतील” डॉक्टरांनी बोलता बोलता एका प्रिस्क्रिप्शन पेपर वर डॉक्टर सिंधू माधव यांचे नाव आणि नंबर लिहून अनिलकडे दिले आणि त्यांना उद्याच भेट असे त्याला बजावून सांगितले. आधीच सविताच सोडून जाण अनिलला आतून पोखरत होतं