अदित्य व त्याचे आई वडील प्राचीच्या घरून गेल्यावर प्राचीचे बाबा श्री वर खूप चिडतात. एवढं सर्व झाल्यावर त्यांना अदित्य चा लग्नासाठी होकार येईल याची आशा सोडून दिलेली असते व यासाठी ते अमृता व श्री ला जबाबदार मानत असतात. झालेल्या प्रकाराने प्राची ही दुखावलेली असते. प्राचीला हेच समजत नव्हतं की दादा, वहीनी व अदित्य जर काॅलेज फ्रेंडस् होते तर आज दादा अदित्य वर एवढा का चिडला होतो. रात्री अमृता व श्री आपल्या रूममध्ये बोलत बसलेले असतात. श्रीचा राग अजूनही शांत झालेला नसतो. अमृता ही संभ्रमात असते व भूतकाळातील काही घटना आठवून दुःखी झालेली असते. "हा ईथे येऊच कसा शकतो? याला