स्पर्श - भाग 8

(26)
  • 17.6k
  • 11.6k

आमचा डान्स परफॉर्मन्स झाला आणि आम्ही इतरांचे डान्स पाहू लागलो ..जवळपास सर्वच कलासमेंट्स एकाच लाइनमध्ये बसून होतो..एखादा डान्स सुंदर झाला की शाश्वत आणि विकास ओरडायचे तर मी शिट्टी वाजवायचो ..आम्हाला निकालाच काहीच टेंशन नव्हतं पण मानसीचा चेहरा मात्र फार उतरला होता ..राहुल तिच्या बाजूला बसून होता व तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता पण तरीही तिचा मूड काही ठीक झाला नाही ..डान्स स्पर्धा नंतर रॅम्प व्हॉकदेखील संपली ...आता होती निकालाची वेळ ..प्रत्येक वेळा एखाद्या स्पर्धेच्या विजेत्यांच नाव घेतलं जायचं आणि तो व्यक्ती खुश होऊन समोर जात होता..त्यांच्या चेहऱ्यावरच हसू बघून मानसिचे हावभाव बदलत होते ..थोड्याच वेळात डान्स स्पर्धेचे