मानसकन्या

(20)
  • 22.8k
  • 2
  • 7.2k

पारावरती पक्षांचा किलबिलाट चालू होता.सगळे पक्षी मिळून आज खूप दिवसांनी गप्पा मारत होते. तेवढ्यात एक पोपट तिथे आला. चेहऱ्यावरून तो खूप उदास वाटत होता. त्या पक्षांपैकी एका पक्षाने त्याला तो उदास असल्याचे कारण विचारले. त्यावर तो पोपट पक्षी म्हणाला..., मी आत्ताच एका बंदिस्त पिंजऱ्यातून सुटून आलोय. मी गेले कित्येक वर्षे त्या पिंजऱ्यात बंदिस्त होतो.माझी ती इच्छा ती मानसकन्येमुळे पूर्ण झाली. पण माझ्यासाठी तिने स्वता:चा जीव धोक्यात घातला, त्यामुळे मी उदास आहे. त्या दुसर्या पक्षाने मोठ्या कुतूहलाने विचारले..,ही मानसकन्या कोण? आणि तिचा काय संबंध या सगळ्याशी...? अशा प्रकारे घडलेली सर्व हकीकत पोपट पक्षी सर्व पक्षांना सांगू लागला.