तू जाने ना - भाग ३

  • 19.6k
  • 1
  • 10.6k

भाग - ३आज ऑफिसमध्ये सुहानी कबिरशी जे काही वागली होती, ते आठवून ती थोडं विचित्रच फील करत होती... कोणाला असं घालून पाडून बोलणं हे तर तिच्या स्वभावात नव्हतं पण वयाच्या १२-१३ व्या वर्षात त्या निरागस डोळयात तो द्वेष, तो राग तिचे बाबाच देऊन गेले होते... आणि त्यात आज भर म्हणजे सकाळीच डॉक्टर अमेय साठे ह्यांनी तिच्या आईच्या खालावत चाललेल्या तब्येतीबद्दल सांगितलं होतं... "त्यांनी जगण्याची आशाच सोडली तर त्यातून त्या वाचणं शक्य नाहीए..." डॉक्टर साठ्यांचे हेच शब्द तिच्या कानात घुमत होते... आपली आई आता जीवन आणि मृत्यूच्या दारावर तिच्या आयुष्याची कमी होत जाणारी वेळ बघत उभी आहे, ह्या जाणिवेनेच तिने आज