सोनाली एका आयटी कंपनीत बंगलोरला कामाला होती. तिचे आईवडील, छोटा भाऊ मुंबईत होते. सोनाली लहानपणापासून अभ्यासाव्यतिरिक्त इतर बाबतीतही हुशार होती.त्यामुळे काॅलेज संपायच्या अगोदरच तिला एका आयटी कंपनीत नोकरीचा काॅल आला.खूप चांगली अपाॅरच्युुुुनिटी असल्याने तिने हि संंधी सोडली नाही. आईवडील दोघांनीही तिला समजवायचा खूप प्रयत्न केला.पण सोनालीला डोळ्यासमोर बंगलोरच दिसत होते. शेवटी तिने आपल्या शिक्षकांचा सल्ला घेतला. शिक्षकांनीही तिच्या बोलण्याला दुजोरा दिला. त्यांची एक नातेवाईक बंगलोरला रहात होती.तिच्याकडे सोनालीची सोय होण्यासारखी होती. आईवडील आता निर्धास्त होते. पण अचानक त्या नातेवाईकांना परगावी जावे लागले.