स्पर्श - भाग 7

(24)
  • 20.5k
  • 1
  • 12.9k

आयुष्यात गेलेला प्रत्येक दिवस विसरायचा असतो मग तो वाईट असो की चांगला कारण प्रत्येक नवीन सकाळ आयुष्यात नवीन रंग घेऊन येत असते ..कालचा दिवस खूप मस्त गेला ..सर्वांनी धमाल केली होती ..त्यामुळे तोच रंग घेऊन कॉलेजला गेलो आणि समोरच नेहा उभी होती .मला पाहताच माझ्याकडे येत म्हणाली , " अभि काय मस्त स्केच काढतो यार तू ..प्लिज मला पण काढून दे ना माझं स्केच "..मी काहीही समोर बोलणार तेवढ्यात चेहऱ्यावरचा स्कार्फ काढत मानसी येऊ लागली पण ती आज एकटीच नव्हती ..काही अंतरावरून तो तिच्यासोबत बोलत येत होता ..मी मानसीला याआधी कुणाशी तेवढं बोलताना , हसताना