अंतःपुर - 5

  • 12.6k
  • 1
  • 6.6k

५. द्वि राक्षस समोरासमोर ( डेव्हिल मिट्स डेव्हिल)...त्या रात्री शक्ती पुन्हा त्याच नाईटक्लबमध्ये त्याच जागी बसला होता. जशी काही ही जागा आज त्याच्यासाठीच रिक्त ठेवण्यात आली होती. आजही त्याने मिटिंग आहे सांगून ऑर्डर देण्यास टाळाटाळ केली होती! आजही डॅनियल काल सारखाच, पण शक्तीच्या आधी येऊन शक्तीसाठी राखून ठेवलेला सोफ्याच्या डाव्या बाजूला मागे एका कोपऱ्यात त्याच्या अत्यंत सूंदर अशा गर्लफ्रेंड सोबत बसला होता. पण आज ती मुली वेगळी होती. जशी वेटरने त्या व्यक्ती म्हणजे डॅनियलला ऑर्डर सर्व्ह केली, तसा डॅनियल आपल्या जाग्यावरून उठला. दोन ग्लास उचलून तो शक्तीच्या दिशेने आला. एक ग्लास शक्तीच्या समोर टेबलवर ठेवला व त्याच्या दिशेने सारला. "आय डोन्ट ड्रिंक!"