आजारांचं फॅशन - 14

  • 6.3k
  • 2.2k

सविता निघून गेल्यानंतर अनिल पाच मिनिटे बेडवर शांत बसून स्वतःशीच पुटपुटत होता “बर झाली गेली कटकट, सुटलो एकदाचा, आता नाक घासत जरी आली ना तरी दारात पाय पण नई ठेवू देणार, अन येऊद्या त्या तिच्या आईला मला काय विचारायला दाखवतोच तिला बरोबर, म्हातारिणीच फुगवलंय हिला म्हणून एवढी भुकतीय” अनिल ताडकन उठून उभा राहिला, पॅन्टच्या खिश्यात हात घालून पैसे काढून मोजले, पैसे परत खिशात ठेवून पॅन्ट घातली, शर्ट अंगावर चढवून शर्टचे बटन लावत लावतच घरा बाहेर पडला आणि मागे पुढे न बघता तडक वाईन शॉपला जाऊन स्वारी थांबली आणि क्षण भर पण वाया न घालवता खिश्यातुन दोनशे रुपय काढत काउंटर वर