कष्टाची कमाई

(15)
  • 20.9k
  • 3
  • 5.2k

कष्टाची कमाईगणपत आणि श्रीपत हे दोघे जिवलग आणि लंगोटी मित्र. लहानपणापासून ते एकाच शाळेत शिकले आणि एकत्र वाढले. मात्र आज गणपत आपल्याच गावात शेती करून आपले घर चालवितो तर श्रीपत मोठ्या शहरात मोठ्या बंगल्यात राहून ऐशोरामचे जीवन जगतो. शाळेत शिकत असतांना दोघे ही फार हुशार नव्हते, पण अगदी ढ देखील नव्हते. गणपतचा स्वभाव अगदी भोळा आणि सहकारी वृत्तीचा तर श्रीपत मात्र खूपच चलाखी करायचा, बढाया मारण्यात हुशार आणि लबाडीमध्ये तर त्याचा कोणी हात धरू शकत नव्हते. त्याची तीच चलाखी आणि लबाड बोलण्याची वृत्ती त्याला त्या पदापर्यंत नेली तर गणपतच्या भोळ्या स्वभावामुळे तो गावी शेतातच राबत राहिला. श्रीपतने अनेक वेळा त्याला