प्रित - भाग 1

(18)
  • 8.4k
  • 1
  • 3.4k

"प्राची उठ किती उशीर झालाय बघ उठ बघू आता लवकर." आई प्राचीला झोपेतून उठण्यासाठी आवाज देत असते पण प्राचीवर मात्र त्या आवाजाचा काहीच परिणाम नसतो. प्राचीला आवाज देऊन वैतागलेली आई प्राचीच्या रूमच्या बाहेर निघून जातात. जातानी त्या रूमच्या खिडकीचा पडदा उघडतात. खिडकीतून येणारी सूर्याची किरणे प्राचीच्या चेहऱ्यावर रेंगळतात. त्यामुळे मुळातच सुंदर असलेल्या प्राचीचं सौंदर्य अजून खुलून दिसतं. आई प्राचीच्या रूम मधून निघून खाली किचन मध्ये येतात. तिथे अमृता नाश्त्याची तयारी करत असते. अमृता प्राचीच्या मोठ्या भावाची म्हणजे श्री ची बायको. अमृता व श्री कॉलेज पासून सोबत असतात व एक वर्षापूर्वी त्यांनी घरच्यांच्या मर्जीने लव मॅरेज केलेले असते. आईंना किचन मध्ये