स्पर्श - भाग 6

(25)
  • 22.8k
  • 2
  • 15k

कॉलेज एक असा कट्टा जिथे प्रत्येक व्यक्ती हरवून जातो ..हीच ती वेळ असते जेव्हा आपण घरच्या वातावरणातून मुक्त होऊन एक प्रेमाचा आधार शोधत असतो आणि नवनवीन व्यक्तींकडे आकर्षिल्या जातो आणि त्यांचा सहवास हवाहवासा होतो ..रात्र फक्त कशीतरी घरात काढावी लागते बाकी ओढ असते पुन्हा मित्रांना भेटण्याची त्यातही आपण प्रेमात पडलो की मग मजाच वेगळी ..कुणीतरी आपल्याला पाहणार म्हणून थोडं नटून - सजून जाण्याचे ते दिवस अगदीच जवळचे वाटू लागतात आणि मग खऱ्या अर्थाने कॉलेज लाइफ काय असते ते जाणवू लागत ..माझ्याकडे तर जिवाभावाचे मित्र होते आणि नव्याने प्रेमात पडलो त्या क्षणांना शब्दात मांडण देखील शक्य नव्हतं त्यामुळे