शेतकरी माझा भोळा - 16 - अंतिम भाग

  • 8.1k
  • 2.7k

१६) शेतकरी माझा भोळा! थकला-मांदला गणपत शेहरात पोचला यार्डाकड जाताना त्येन ग्यासतेल, दोन बिंडल, येक काड्याची डब्बी घेतली. गणपत यारडात पोचला तेव्हा ड्रावर म्हन्ला, "पाटील, बिगीनं जावा. गेरडरचा माणुस यिवून गेला. फोल्डर घिवून बलीवलंय. पाटील, काय तरी जाळभाज करुन टाका." गणपत गेरडरसायेबाच्या म्होरी उबा ऱ्हायला. गेरडरसायेबाफुडी फोल्डर ठिवलं. फोल्डर फात सायेब म्हन्ले, "तुम्हीच का गणपत? त्या लाल ट्रॅक्टरमधला पांढराशुभ कापुस तुमचाच का?""व्हय. व्हय ! सायेब, त्योच. सायेब, बुडापस्तोर सम्दी कपास तस्सीच हाय, येका बोंडाला तं डाग न्हाई का