कादंबरी- जिवलगा ...भाग-२९ वा

(20)
  • 14.8k
  • 8.3k

कादंबरी – जिवलगा .. भाग -२९ वा --------------------------------------------------------- मधुरिमादीदी सतत आपल्याबद्दल किती विचार करीत असते ,हे नेहाला अनिता आणि सोनियाने सांगितल्याने कळाले . या अशा गोष्टी मनात आपलेपणाची भावना असल्याशिवाय होत नसतात . आणि मावशीकडे आल्यापासून नेहाला दीदीच्या स्वभातील आपलेपणाचा हा गुण सतत जाणवत असायचा . कदाचित .दीदीला स्वतःला नात्यातील कुणाकडून कधीच काही मिळाले नाही ,म्हणून आता ती सतत सगळ्यांसाठी काही न काही करण्याची मनापासून धडपड करीत असते . आता जरी परदेशात गेलीय ती पण तिचे लक्ष इकडेच असते . नेहाला गंमत वाटली की.. दीदीला वाटत असते नेहाला तिचा एक छान मित्र मिळाला पाहिजे , आणि या भावनेतून दिदींनी विचारपूर्वकच