अंतःपुर - 4

(21)
  • 14.5k
  • 7.9k

४. मोहिनी (फेम फेटल)...दुसऱ्या दिवशी शक्तीची फोर व्हीलर कोल्हापूर एसपी ऑफिसच्या बाहेर होती. तो मोबाईलवर बोलत होता..."मिहीर, वाचस्पतींच्या खुन्याला मारायला वापरलेली स्नाईपर रायफल सापडली?"एसपी ऑफिसर मध्ये वर्किंग डेस्क, मिहीर नांवाचा डीवायएसपी शक्तीच्या प्रश्नांना उत्तर देत होता..."हो सर.""काय मी पाहू शकतो?" शक्तीने पलिकडून विचारलं."नक्कीच सर! मी येतो घेऊन तुमच्याकडे!" मिहीर एक्साईमेन्टमध्ये म्हणाला."ठीक आहे तर, मी खालीच आहे. ये!" शक्तीने कॉल कट केला.आणि तो मिहीरच्या येण्याची वाट पाहू लागला...शक्तीची गाडी एसपी ऑफिसच्या कंपाऊंडला लागून असलेल्या फुटपाथजवळच उभी होती. मिहीर रायफल असलेली केस घेऊन धावत ऑफिस उतार झाला होता. तो झटकन येऊन शक्तीच्या बाजूला बसला...गाडीत बसल्या बसल्या मिहीरने रायफलची केस मांडीवर ठेवत शक्तीशी