भाग १४ आश्रमात आली तर चांगलाच बाहेर अंधार पडला होता. पोरी जेवण करून वर टेरेसवर अंथरूण घालून तिथेच गप्पा मारत बसल्या होत्या. विशाखा घरात आली त्यावेळी तिला कोणच दिसलं नाही फक्त काका तेवढं किचन आवरत होता. ती सावकाश पावलं टाकत त्याच्या मागे जाऊन थांबली. " आज खुप दिवसांनी दर्शन दिलं. कसं काय या पामरावर आपली कृपा झाली ?? " त्याच काम करता करताच त्याने विशाखाला विचारलं. " तुला असं कळलं मी आले ते ??? मी तर एकदम हळु हळु आले, ते पण आवाज न करता. " " गाडीचा भोंगा मग काय मी वाजवला होता. " " ओह ??. तरीच म्हणलं तुला कसं कळालं. " " जेवायचं