तारेवरची कसरत - अंतिम भाग

  • 5.7k
  • 2k

तारेवरची कसरत -४ (वैधानिक इशारा: सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, कथेतील पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत. कथा व कथेतील पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी अथवा समूहाशी काहीही संबंध नाही. असा संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा) (अधिक रंजकते साठी कथा क्रमशः वाचावी.) "निघाला टोणगा म्हशीकडे..." - असा अस्पष्ट आवाज खोलीचं दार लावताना माझ्या कानावर पडला, सवयी प्रमाणे मी त्याकडे दुर्लक्ष केलं. आईची भेट घेऊन मी आता आमच्या बेडरूमपाशी उभा होतो. आईशी बोलल्यामुळे, तिची बाजू ऐकल्यामुळे माझे डोळे पाणावले होते. त्यातच मी नलु मावशीच्या मुलीशी दुसरे लग्न करावे असा तिचा हट्ट होता. तिच्या या विनंतीवजा आज्ञेला कसे उत्तर दयायचे