आजारांचं फॅशन - 12

  • 5.5k
  • 2.2k

रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान अनिल घरी पोहचला, मुले झोपली होती आणि सविता टी व्ही वर काही तरी कार्यक्रम पाहत होती, अनिलने दार वाजवले, दरवाजा उघडला, अनिल आत जाण्या आधी दारूच्या वासाने गृहप्रवेश केला, सविताचा चेहरा सरस्वती पासून चंडिके मध्ये क्षणात परिवर्तित झाला. एखादी गाडी कशी पहिल्या गियर पासून दुसरा, मग तिसरा आणि मग चौथ्या गियर मध्ये हळू हळू वेग वाढवते, तसा सविताचा पहिला गियर पडला. "आलेना पिऊन? खोकला झालाय ना, दहा वेळा डॉक्टरचा उंबरा झिजविला, दारू घश्यात वत्तांना नई आला का खोकला, काय मेल नशीब माझं, दोन दिवस हा माणूस सुखानी जगून देत नई, एक दोन दिवस नई पीलिका