प्रपोज - ९

(23)
  • 11.6k
  • 1
  • 4.2k

" काही नाही होणार. उगाच कशाला घाबरतेस..?" मावशीच्या आवाजात थोडा राग होता जशा त्या खेकसत होत्या.. प्रियान खिडकीची कडी सट्ट कन खाली खेचली आणी कुईईई आवाज करत ती खिडकी उघडली.. आणी मी समजुन गेलो की पलीकडे रूम नाही तर हीच शेवटची रुम होती, दुस-या मजल्यावरची . आणखी एक एक लक्षात आल की आत येतान खिडकीत दिसलेली आकृती याच रुममधे होती.. " प्रिया... जाऊदे ..मला भास झाला असेल..."पन ती खिडकीमधे पाठमोरी उभी शांतपने बाहेर पहात होती... मी पुन्हा हाक दिली पन काहीच प्रतिसाद येईना.. तोच एक थंड हवेचा झोका खिडकीतुन आत शिरला तसा सर्रर्रर्रर कन अंगावर काटा आला... प्रिया म्हणुन मी जोरात ओरडलो