अंघोळ वैगेरे आणि नाश्ता पाणी आटपून अनिल खोकत शिंकत गॅरेजवर गेला, एखादा तास भर थांबला आणि छोटूला बोलला, खूप सर्दी खोकला झालाय डॉक्टर कडे जाऊन आलो, छोटूसाठी देखील अनिलच आजारपण आणि डॉक्टरच्या वाऱ्या नवीन नव्हत्या. “आज काय झालं अनिल? डॉक्टर अडवाणी खुर्चीवर डुलत डुलत बोलले “खूप सर्दी आणि खूप खोकला आहे सकाळपासून” “अच्छा अजून काही? डॉक्टरांनी नेहमीच्या शैलीत विचारलं “नाही अजून काही नाही” अनिलने हळूच उत्तर दिले डॉक्टरांनी स्वतःजवळची काही औषधें दिली आणि दोन औषधें बाहेरची लिहून दिली आणि कशी घायची ते समजावले. अनिल औषधें घेऊन सरळ घरी गेला. “अरे आज तुम्ही दुपारीच घरी, तब्येत ठीक आहे ना” सविता ने