नियती

(11)
  • 6.6k
  • 2.2k

....नियती...​​ आज तिला जाऊन बारा वर्षे झालीत.असं वाटते ती अगदी आमच्यातच आसपास आहे. तिचा उल्लेख केल्याशिवाय आम्हा दोघीही मैत्रीणींचं बोलणंच सुरू होत नाही. तशीच होती ती कायम कुणाच्याही स्मरणात राहील अशी..​ वीणा तिचं नाव दिसायला सामान्य नाकी-डोळी ठीकठाक, सावळी नटणं,थटणं आवडायचं तिला..नावाप्रमाणेच कुठल्याही परिस्थितीत आनंदीत असणारी..अत्यंत गरीब मुलगी तिला लहान तीन बहिणी, बाप दारूड्या त्यामुळे आई चारही मुलींना घेऊन घर सोडून तिच्या आजीच्या घरी आश्रयास आली.मामाची नोकरी बाहेर गावी असल्यामुळे तो तिथेच पत्नीला घेऊन राहायचा.​आम्ही सातवीला होतो तेव्हा तिने आमच्या वर्गात प्रवेश घेतला.एकतर नवीन आणि बोलायला