कादंबरी- जिवलगा ..भाग-२८

(28)
  • 14.9k
  • 2
  • 8.7k

कादंबरी –जिवलगा .. भाग-२८-वा ---------------------------------------------------------- ऑफिसमध्ये एकट्या नेहाचीच अशी बदली झालेली नव्हती , तिच्या सारख्या अनेक मेम्बर्सना वर्क चेंज होणे आवश्यक आहे “या नावाखाली ..या मजल्यावरून –त्या मजल्यावर शिफ्ट केले होते . या सगळ्यां नव्याने भरती झालेल्यानच्या मनात एकच भावना .. नऊ तास जॉब करायचा , कोणता टेबल, कोणती टीम ? ..काही फरक अडणार नव्हता या सर्वांना . समोरचा टेबल आणि त्यावरचा कॉम्पुटर आणि त्यातला प्रोग्राम ..याबद्दल माहिती करून घेतली की ..ही सारी जण अगदी सफाईदारपणाने आपापल्या कामात गुंतून घेत ..ऑफिस आणि जॉब एन्जोय करीत आहेत . ऑफिसमध्ये आल्यावर नेहाला हा सीन रोजच पाहायला मिळत असे . आता तीन आठवडे झाले